फालुन दाफा संस्थापक मास्टर ली होंगजी यांचा नवा लेख
निर्मात्याला सर्व जीवांना का वाचवायचे आहे
निर्मात्याला सर्व जीवांना का वाचवायचे आहे? कारण त्यांचे ह्या जीवांप्रती असलेले प्रेम आहे, कारण त्यांनीच ह्या सर्वांना जीवन दिले आहे.
विश्वाच्या निर्मिती, स्थिरता, पतन आणि विनाश या अवस्था चक्राच्या अखेरच्या टप्प्यात, निर्मात्याने २०० दशलक्ष वर्षात मानवी संस्कृती, विचार आणि आचरणाचा पाया रचत, त्रिलोकाच्या निर्माणासाठी तसेच ही सृष्टी वाचवण्यासाठी नियोजन, अनेक प्रकारच्या व्यवस्था आणि संधी निर्माण केल्या. शिवाय त्यानी स्वत:च्या पवित्र शरीराचा उपयोग असंख्य जीवांचे पापकर्म कमी करण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी केला! त्यांनी सर्व जीवांना वाचवण्यासाठी आपले सर्व काही दिले.
तसेच या २०० दशलक्ष वर्षात निर्मात्याने असंख्य वेळा अनेक शरीरांद्वारे पुनर्जन्म घेतला, मानवी नैतिकतेची देखरेख आणि रक्षण करत या जगात मानवजातीच्या संस्कृतीचा पाया घातला. हे त्यांनी यासाठी केले, जेणेकरून अंतिम काळामध्ये मुक्ती प्रदान करण्याची वेळ येईल तेव्हा लोक उच्चस्तरीय जीवांनी त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या मानकांची पूर्तता करू शकतील. इतिहासाच्या मोठ्या आणि प्रदीर्घ कालखंडात, लाखो वर्षांच्या प्रतीक्षेत, लोकांच्या चेतनेचा वारंवार पुनर्जन्म झाला आहे. काळाबरोबर जगातील बहुतेक लोकांच्या (यात सर्व जाती आणि वंशाचा समावेश आहे) चेतनेच्या मूळ शरीरांनी निर्मात्याशी काही प्रकारचे कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले. आणि यामुळेच, निर्मात्याने जगातील लोकांवर, त्यांच्या लोकांवर अधिक प्रेम केले. आता अंतिम काळात असे नाते नसलेले जीव मनुष्य बनू शकत नाहीत. मुक्ती प्रदान करण्याचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे म्हणून असे करण्यात आले. तोपर्यंत, या पृथ्वीवरील लोकांचे खरे शरीर, सर्व त्यांच्या लोकांचे होते. आणि यात ते उच्चस्तरीय जीव देखील होते, ज्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात, त्यांनी मनुष्य जन्म घेतला आणि धार्मिक शिकवण देण्याचे काम केले. मानवी शरीर धारण करणाऱ्या उच्चस्तरीय जीवांचा हेतू, निर्मात्याद्वारे जगातील लोकांच्या अंतिम उद्धारासाठी एक संस्कृती प्रस्थापित करणे हा होता. त्यांनी या जगात सोडलेले सदाचारी आणि खरे धर्म देखील नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी अस्तित्वात आहेत कारण लोक निर्मात्याकडून त्यांच्या अंतिम मुक्तीची वाट पाहत आहेत. निर्मात्याला त्यांच्या लोकांवर प्रेम करण्याचा अधिकार आहे, आणि ज्यांना ते प्रेमास योग्य समजतात त्यांच्यासाठी त्यांचे प्रेम अधिक मोठे आहे. हा त्यांचा अधिकार आहे, आणि कोणालाही किवा कोणत्याही घटकाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही! हीच त्यांची सर्व जीवांवर सर्वोच्च कृपा आहे!
निर्माता या मोठ्या विश्वातील सर्व उच्चस्तरीय जीवांचा कर्ता आहे. तो कर्त्यांच्या कर्त्याचा, राज्यांच्या राजाचाही निर्माता आहे, सर्व जीवांचा सार्वभौम आहे - ज्यात तीन लोकातील मानवी जीव, पवित्र जीव आणि भौतिक गोष्टींचा समावेश आहे, जे सर्व त्यांनी बनवले आहेत. त्यांचे प्रेम हेच सर्व जीवांसाठी सर्वोच्च आणि पवित्र आशीर्वाद आहेत! या जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्यांच्या प्रेमास पात्र होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही!
मास्टर ली होंगज़ी
एप्रिल 17, 2023