
English | हिन्दी | বাংলা | मराठी | తెలుగు | தமிழ் | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | മലയാളം | ਪੰਜਾਬੀ

फालुन दाफा
सत्य, करुणा, सहिष्णुता
फालुन दाफा (Falun Dafa), ज्याला फालुन गोंग (Falun Gong) म्हणून देखील ओळखले जाते, ही एक विनामूल्य साधना पद्धती आहे, ज्यामध्ये पाच व्यायाम आहेत, जे सौम्य आणि शिकण्यास सोपे आहेत. सर्व वयातील आणि व्यवसायातील लोक करू शकतात. हे बौद्ध परंपरेवर आधारित सत्य, करुणा, सहिष्णुता द्वारे आध्यात्मिक / आत्म-सुधारणा देखील शिकवते. जे लोक फालुन दाफाचा सराव करतात त्यांना अनेकदा आरोग्य लाभ तसेच नवीन ऊर्जा, मानसिक स्पष्टता आणि तणावमुक्तीचा अनुभव येतो. फालुन दाफा हे मूलतः चीनमध्ये श्री ली होंगझी (Mr. Li Hongzhi) यांनी सुरु केली. आज, भारतासह 100 हून अधिक देशांमध्ये करोडो लोक याचा सराव करतात.
100% विनामूल्य, ऑनलाइन किंवा वैयक्तिकरित्या शिका
जगभरात तसेच भारतात - फालुन दाफा शिकणे आणि त्याचे सराव करणे १००% मोफत आहे. हे खरं आहे, ही अद्भुत सराव शिकण्यासाठी पैशे लागत नाही! तुम्ही खालील माध्यमांद्वारे, फालुन दाफा - -ऑनलाइन किंवा वैयक्तिकरित्या - शिकू शकता.
फेसबुक | आमच्या वेबपेजवर,मेसेंजर किंवा व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवा फेसबुक वेबपेज |
वैयक्तिकरित्या | तुमच्या जवळच्या शहरातील संपर्क व्यक्ती येथे शोधा FalunDafaIndia.org |
ध्यान व्यायाम
फालुन दाफामध्ये 5 साधे व्यायाम आहेत - चार उभे राहून केली जाणारी आणि एक बसून केला जाणारा ध्यानाभ्यास . हे व्यायाम शिकण्यास सोपे आहेत आणि कोणत्याही वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील लोक, त्याचा सराव करू शकतात.
बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन | हळुवार स्ट्रेचिंग हालचालींद्वारे, हा व्यायाम शरीरातील सर्व ऊर्जा वाहिन्या उघडतो. |
फालुन स्थिर मुद्रा | चार स्थिर मुद्रांचा/आसनांचा समावेश आहे ज्यात , प्रत्येकामध्ये अनेक मिनिटे थांबणे आवश्यक आहे. हा व्यायाम एखाद्याची उर्जा पातळी वाढवतो आणि ज्ञान जागृत करतो. |
ब्रह्माण्डाच्या दोन किनारयांचे छेदन करणे | हात-ग्लायडिंगच्या/सरकत्या हलक्या हालचालींसह, हा व्यायाम ब्रह्माण्डातील ऊर्जा वापरून शरीर शुद्ध करतो. |
फालुन अलौकिक कक्षा | संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने ट्रेस करून, हा व्यायाम शरीरातील सर्व असामान्य परिस्थिती सुधारतो आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्रसारित करतो. |
अलौकिक शक्ती सुदृढ करणे | एक ध्यानाभ्यास ज्यात गहन शांततेत प्रवेश करून, मन आणि शरीर दोन्ही पुन्हा उघडले जातात, अलौकिक शक्ती आणि ऊर्जा सामर्थ्य दृढ केले जातात |
पुस्तके
प्रास्ताविक पुस्तक फालुन गोंग आहे, परंतु मुख्य शिकवणी झुआन फालुन (Zhuan Falun) या पुस्तकात आहेत. अनेक पूरक शिकवणी देखील उपलब्ध आहेत. सर्व पुस्तक FalunDafa.org वर विनामूल्य ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
फालुन गोंग (इंग्रजी) | चित्र आणि व्यायामाचे तपशील असलेले प्रास्ताविक पुस्तक. |
झुआन फालुन (इंग्रजी) | शिकवणी असलेले मुख्य पुस्तक. |
इंग्रजीमध्ये 1996 ते 2023 पर्यंत अनेक पूरक व्याख्याने/शिकवणी देखील उपलब्ध आहेत FalunDafa.org वेबसाइट.
व्हिडिओ आणि ऑडिओ
व्हिडिओ आणि ऑडिओ फाइल्स FalunDafa.org वर विनामूल्य उपलब्ध आहेत,. (व्यायाम-सूचना आणि व्हिडिओ -व्याख्याने यावेळी फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत, आम्ही व्यायाम ऑनलाइन किंवा वैयक्तिकरित्या शिकण्याची आणि वरील अनुवादित पुस्तके वाचण्याची शिफारस करतो.)
व्यायाम संगीत | 1 ते 5 व्यायामांसाठी. व्यायाम करताना संगीत प्ले करा. |
व्यायाम सूचना | व्यायाम कसे करावे हे शिकवणारा सूचना व्हिडिओ. |
व्हिडिओ व्याख्याने | 9 दिवसांची व्याख्यानमाला. |
चीनमध्ये छळ
फालुन दाफा जरी चीनमध्ये लोकांसमोर आणला गेला आणि आता जगभरातील करोडो लोक त्याचे अनुसरण करत असले तरी, चीनमध्ये, त्याच्या मूळ भूमीत, चिनी कम्युनिस्ट पक्ष, फालुन गोंगचे छळ असा करतो जसा इतर अल्पसंख्यक गटांचा. खालील लिंक्सवर अधिक माहित आहे.